100% मतदान आणि एनजीओची  भूमिका ग्रामायण प्रतिष्ठान आणि पर्यावरण क्षेत्र यांच्या तर्फे सभेचे आयोजन

ग्रामायण प्रतिष्ठान आणि पर्यावरण क्षेत्र यांच्या संयक्त वतीने निर्वाचन  आयोगाच्या निर्देशानुसार नागपुरातील एनजीओ /सेवाभावी संस्था यांच्या एका सभेचे आयोजन ‘100 टक्के मतदान आणि एनजीओची भूमिका’ हा विषय घेऊन केले आहे. गुरवारी 4 एप्रीलला 4.30 वा. ही सभा अंध विद्यालय परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग नागपूर येथे होणार आहे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव किंवा ज्येष्ठ पदाधिकारी  असे किमान दोन पदाधिकारी या सभेत आमंत्रित आहेत. आपण या सभेत येऊन ‘100 टक्के मतदान आणि त्यात एनजीओची भूमिका’ या संबंधी आपले कार्य, कार्यक्रम, विचार, सूचना यांची माहिती देऊन सर्वांना मार्गदर्शन करावे, ही विनंती. कृपया आपण सभेसाठी येत आहात याची निश्चिती खालील नंबरवर कळवावी धन्यवाद