सुखी, समृद्ध व स्वस्थ जीवनासाठी गोवंश आधारित जीवनशैली स्वीकारा

सुखी, समृद्ध व स्वस्थ जीवनासाठी गोवंश आधारित जीवनशैली स्वीकारा
– रा. स्व. संघाचे अ. भा. गौसेवा सहप्रमुख अजीत महापात्र यांचे प्रतिपादन- ग्रामायण गोमय कौशल्य विकास प्रशिक्षण व निर्मिती केंद्राचे लोकार्पण
नागपूर :  गो-विज्ञान या क्षेत्रात कार्यरत असलेले देशात सात हजारांहून अधिक प्रकल्प आहेत. ते एकत्रित येणे गरजेचे आहे. हाच सुख व समृद्धीचा मार्ग आहे. भारतात उपलब्ध असलेल्या गोवंश कार्याचा विचार केल्यास पाच हजार कोटींची वार्षिक उलाढाल शक्य असून त्यासाठी गोवंश आधारित जीवनशैली स्वीकारावी लागेल असे आवाहन  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. गौसेवा सहप्रमुख अजीत महापात्र यांनी केले.
ग्रामयण प्रतिष्ठानच्या प्रवासातील मैलांचा दगड अर्थात स्थायी स्वरूपाचे ग्रामायण गोमय कौशल्य विकास प्रशिक्षण व निर्मिती केंद्राच्या लोकार्पणाप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. स्वयंसेवी संस्था निसर्ग विज्ञान मंडळाच्या नेत्रवन या सेवा प्रकल्पावर हे केंद्र सुरू झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विहिंपच्या गौरक्षा विभागाचे केंद्रीय मंत्री सुनीलजी मानसिंहका, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे, सचिव संजय सराफ, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव शशिकांत कोठारकर, नागपूर महानगर गोसेवा विभागचे प्रमुख हितेश जोशी, उद्योजक हेमंत अंबासेलकर, उमरेड तालुका संघचालक अरविंद हजारे व डॉ. दांडगे उपस्थित होते.
या प्रसंगी सुनील मानसिहंका यांनी परिपूर्ण गो विज्ञान प्रकल्पाधारित काम व्हावे, जिल्हा जिल्ह्यात प्रकल्पाच्या शाखा स्थापन व्हाव्यात तसेच हे केंद्र केवळ गोशिल्प तयार करण्यासाठी न राहता, ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल तयार व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. तर प्रदीपजी खंडेलवाल यांनी ग्रामीण भागातील तरुणांनी या कार्यात उतरल्यास ते उदरनिर्वाहासह आई वडिलांचीही सेवा करू शकतील असे मत व्यक्त केले. 
यावेळी प्रकल्पात रोजगार मिळालेल्या महिला प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक वर्धा येथील गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे प्र. कुलगुरू चंद्रकांत रागीट यांनी केले. प्रामुख्याने ग्रामीण भागाच्या विकासाच्या मुख्य हेतूने हा प्रकल्प 2012 साली सुरू झाला. त्याचे रूपांतरण आता ग्रामायण गोमय कौशल्य विकास प्रशिक्षण व निर्मिती केंद्रात होत असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संचालन विजय घुगे यांनी केले. या संपूर्ण सोहळ्याचे ग्रामायण प्रतिष्ठानच्या https://www.facebook.com/gramayanpratishthan/ या फेसबुक पेजवर होई थेट प्रक्षेपण होणार असून,नागरिकानी सोहळ्याला मोठ्या संख्येने बघावे असे आवाहन ग्रामयण प्रतिष्ठान आणि निसर्ग विज्ञान मंडळाने संयुक्तरित्या केले आहे.