वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ग्रामायण 1000 नोट बुक संच

वसतिगृहात राहून शिकणार्‍या वनवासी भटक्या तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अल्पशी मदत म्हणून 10 नोटबुकचा एक संच भेट देण्याचे ग्रामायणने  ठरविले त्यानुसार मान्यवरांच्या हस्ते 14 संस्थांना ्रत्यांच्या आवश्यकतेनुसार ग्रामायण संच भेट देण्यात आले. या उपक्रमाच्या खर्चासाठी ग्रामायणच्या कार्यकर्त्यांनी यासाठी आपआपला सहभाग दिला.
सुमारे दोन लाख रू. किंमतीची 7650 ग्रामायण नोटबुकाचे वितरण एक हजार विद्यार्थ्यांना डॉ. एकनाथ चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 8 जुलैला करण्यात आले.