यशस्वी ग्रामायण सेवा प्रदर्शन

यंदा दुसरे ग्रामायण सेवा प्रदर्शन  2018 चे आयोजन 17, 18, 19 व 20 नोव्हेंबर 2018 ला करण्यात आले. ब्लाईंड रिलिफ असोसिएशनच्या सहकार्याने त्यांच्या परिसरात हे प्रदर्शन अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. पहिल्या प्रदर्शनापेक्षा अधिक भव्य, अधिक विस्तारीत, अधिक यशस्वी असे हे प्रदर्शन होते. दिव्यांग, महिला, गो सेवा आणि विद्यार्थी या चार विषयांवर प्रदर्शनाचा भर होता आणि रोज एका विषयावर वैचारिक कार्यक्रमातून मंथन हे यंदाचे वैशिष्ट्य होते. तसेच रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी होती. दहा हजारावर लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली. स्टॉलधारकांची भरपूर विक्री झाली. प्रदर्शनात सहभागी झालेला प्रत्येक जण समाधानी होता. एकूण 125 संस्था व ग्रामीण तसेच महिला उत्पादक/उद्योजक यात सहभागी झाले होते. गो आधारित प्रदर्शनाची मांडणी हे पण या वेळचे वैशिष्ट्य होते. बिरेवार फाऊंडेशन आणि टॉपवर्थ मेटल्स अ‍ॅन्ड उर्जा लि. यांनी प्रायोकत्व स्वीकारून भरीव मदत केली.
प्रदर्शनाच्या नंतर प्रदर्शनाचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील नियोजन करण्यासाठी श्री रमेशजी लालवाणी यांच्या बाजारगावजवळील नंदिनी गोशाळेमध्ये 9 डिसेंबर ला दिवसभरांची बैठक घेण्यात