ग्रामायण तिसरे ज्ञानसत्र 28 जून ला परसबागेतील औषधी वनस्पती: लागवड आणि उपयोग मार्गदर्शन : डॉक्टर वृंदा काटे

,

ग्रामायण तिसरे ज्ञानसत्र28 जून लापरसबागेतील औषधी वनस्पती: लागवड आणि उपयोग मार्गदर्शन : डॉक्टर वृंदा काटे

ग्रामायण प्रतिष्ठान नेहमीच विविध वैचारिक, नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. सध्या ग्रामायण प्रतिष्ठान ज्ञान सत्राचे आयोजन करीत आहे. 14 जून रोजी डॉक्टर राजेंद्र काळे यांनी औषधी वनस्पतींची लागवड या विषयावर आपले मार्गदर्शन केले. काल दिनांक 21 जून रोजी वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर महेंद्र दारोकार, लखनऊ यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा विषय होता सुगंधी वनस्पतींची लागवड व मार्केटिंग. तीन हजार पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतलेला हा कार्यक्रम व त्यानंतर झालेली प्रश्न उत्तरे यातून शेतकरी व व्यवसायिकांना चांगले मार्गदर्शन झाले.वनस्पती हाच विषय पुढे चालवत येत्या रविवारी दिनांक 28 जून रोजी ठीक सायंकाळी चार वाजता ज्ञान सत्राचे पुढील सत्र आयोजित करण्यात येईल. विषय आहे औषधी वनस्पतींची परसबागेत लागवड. तज्ञ मार्गदर्शक आहेत डॉक्टर वृंदा काटे. शिक्षणाने आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या वृंदा काटे यांनी औषधी वनस्पतींचा शास्त्रीय अभ्यास व प्रात्यक्षिक यांची सांगड घातली आहे. 1994 पासूनच त्यांनी औषधी वनस्पतींची रोपवाटिका तयार केली. बोर अभयारण्यात औषधी वनस्पतींच्या रोपांची किट वितरित करण्यापासून ते लहान गावांमध्ये आरोग्य सेविकेची काम करणाऱ्या दाई यांनाही त्यांनी औषधी वनस्पतींची माहिती देऊन प्रशिक्षित केले. बुकलेट व डॉक्युमेंटरी च्या माध्यमातून त्यांनी औषधी वनस्पतींचा प्रचार प्रसार व संवर्धनाचे कार्य केले आहे.उपवन या त्यांच्या एनजीओ मार्फत अनेक शासकीय संस्थांना रोपांची माहिती देतात व रोपे पुरवितात. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.फेसबुक लाईव्ह होणाऱ्या या कार्यक्रमात आपण सहभाग घेऊन औषधी वनस्पतींची अधिक माहिती करून घ्यावी असे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानने केले आहे.

संपर्क – सुरेश खेडकर 9823255188 प्रशांत बुजोने 9665054508 जयश्री अलकरी 9822561671

नरसेवा-नारायणसेवा भावनेतून ग्रामायणतर्फे एक हजार विद्यार्थ्यांना 7650 नोटबुक भेट दान सत्पात्री पडल्याची दात्यांची भावना!

Iग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने विदर्भातील 12 संस्थांच्या वसतिगृहातील आणि दोन सेवावस्ती...

ग्रामायण तर्फे बेस्ट फ्रॉर्म वेस्ट कार्यशाळा रद्दी कागदापासून उपयुक्त वस्तु तयार करणे

ग्रामायण प्रदर्शनाचे अत्यंत यशस्वी आयोजन करणार्या ग्रामायण समूहाने गेल्या 29...