ग्रामायण हे सर्व सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते यासाठी उत्तम व्यासपीठ आहे.
समाजसेवेच्या या यज्ञात पती पत्नी दोघांनी मिळून आहुती टाकायची असते. म्हणून पती-पत्नी दोघांनीही मिळून ग्रामायणमध्ये काम करावे, अशी आमची भावना आहे.
ग्रामायण प्रतिष्ठानने स्वत: चा कोणताही प्रकल्प सुरू करायचा नाही किंवा विशिष्ट सेवा क्षेत्र निवडायचे नाही, असे प्रारंभपासून ठरवले आहे.
सेवा संस्था, सेवा कार्यकर्ते यांच्या कार्याचे सोशल मार्केटिंग करण्याची ग्रामायणची भूमिका आहे.
ग्रामीण उत्पादक, कलावंत आणि कारागीर यांना शहरी बाजारपेठ मिळवून देऊन ग्रामीण भागात समृद्धी येण्यासाठी हातभार लावण्याचा आमचा प्रयत्न आहे.
त्या दृष्टीने अशा संस्था, व्यक्ती यांच्या कौशल्याचा विकास व्हावा. त्यांच्या वस्तूंना मुल्याधिक स्वरूप प्राप्त होऊन त्यांना अधिक किंमत सर्वार्थाने समाजात मिळावी, असा आमचा प्रयास आहे.
शहरी भागात असणारे ज्ञान, कौशल्य, अनुभव, तंत्रज्ञान, संबंध आणि धन यांचे पाठबळ या सेवाभावी संस्थाच्या कार्यामागे उभे करण्याची आमची दृष्टी आहे.
तंत्रज्ञान, इंटरनेट, वेबसाईट, सोशल मिडिया आदी नवनवीन साधनांचा उपयोग करून सेवा संस्था आणि ग्रामीण भाग यांचे क्षितिज अधिक विस्तारण्याचाही आमचा प्रयत्न आहे.