स्वयंसेवी संस्थांपुढे सामाजकार्याचे मोठे दालन

स्वयंसेवी संस्थांपुढे सामाजकार्याचे मोठे दालन

 • ग्रामायणच्या ज्ञानगाथेत उलगडली वास्तविकता
  नागपूर, १८ एप्रिल
  देशात सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर, समाज कल्याण विभाग जवळपास निष्क्रीय झाला आहे. सरकार या विभागावरच प्रत्यक्ष समाज कार्याच्या तुलनेत जास्त खर्च करत आहे. यामुळे, नजिकच्या भविष्यात काही निवडक कामे वगळता, इतर सामाजिक कार्यामध्ये सरकारी यंत्रणेचा प्रत्यक्ष सहभाग राहण्याची शक्यता कमी आहे. या संपूर्ण पाश्र्वभूमीवर, स्वयंसेवी संस्थांपुढे सामाजिक कार्याचे एक मोठे दालन खुले झाले आहे, असे मत प्रख्यात अर्थतज्ज्ञ अनिरुद्ध केळकर यांनी व्यक्त केले.
  ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने आयोजित ज्ञानगाथा या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाच्या ४० व्या सामाजिक संस्थांची फंड उभारणी या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. कॉर्पोरेट क्षेत्रातील अकाऊंट्स आणि वित्तीय व्यवस्था या विषयातील ते तज्ज्ञ असून, गेल्या २० वर्षांपासून या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. शिवाय, विविध शैक्षणिक संस्थांमध्ये मार्गदर्शक तज्ज्ञ म्हणून ते जातात आणि सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने चालविण्यात येणाèया ठाणेस्थित ओक रक्तपेढीचे ते अध्यक्ष आहेत.
  यावेळी, सामाजिक संस्थांनी आपली चमू प्रशिक्षित करुन, त्यांना शिस्तबद्ध काम करण्याचे प्रशिक्षण देण्यावर त्यांनी भर दिले. तसेच, कार्यकत्र्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम घाईघाईने उरकू नये, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. सामाजिक संस्थांमध्ये काम करणे, हेदेखील करियर ऑप्शन म्हणून युवावर्गापुढे अलिकडे येऊ लागल्याचे सांगताना, त्यांनी विविध प्रकारच्या दात्यांकडून तसेच, कॉर्पोरेट कंपन्यांकडून सहायता निधी मिळण्याची प्रक्रीया त्यांनी समजावून दिली. यासोबतच, मध्यम स्वरूपाच्या संस्थेने डॉक्युमेंटेशन तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी एक कार्यकर्ता तयार करावा, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. निधी मिळविण्यासाठी संस्थात्मक खर्च दाखविणे आवश्यक असते. त्यादृष्टीने नियोजनपूर्वक हे काम केले जावे आणि संस्थेच्या विचारांशी समन्वय असणारे व्यक्ती असल्यास हे कार्य सहजतेने होते. व्यवस्थापनाचा बराच मोठा दृष्टीकोन यामागे असून, निधीदाते आणि एकूणच हिशेबासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
  …….

सेवा गाथा -21

शनिवार, दिनांक 26, जून20 21सायंकाळी 6.30 वाजताआपली भेट होणार आहे...

नि:स्वार्थ, पारदर्शीपणा आणि सत्पात्री विनियोग असल्यास दात्यांची कमी नाही - रवींद्र कर्वे

ग्रामायण ज्ञानगाथा मध्ये रवींद्र कर्वेदेणगीदार खूप आहेत पण त्यासाठी विश्वास...