मिळालेल्या संधीचे सोने करा : राहुल बडगे

मिळालेल्या संधीचे सोने करा : राहुल बडगे

 • ग्रामायणच्या उद्यमगाथेचा ४० वा भाग
  नागपूर, १७ एप्रिल
  कोणतीही संधी आपल्याकडे आयती चालून येत नाही तर ती आपल्याला शोधावी लागते. पण, मिळत गेलेल्या प्रत्येक संधीचे सोने करणे आपल्या हाती निश्चितपणे आहे. बाजारपेठेचा अभ्यास आणि कौशल्य विकास करून, प्रत्येक संधी प्रत्यक्षात आणणे आपल्याला शक्य आहे. यासाठी आपले अंतिम उद्दीष्ट आणि ते प्राप्त करण्यासाठीचा दृष्टीकोन स्पष्ट असायला हवा. असे झाले तर कामात प्रामाणिकता येते आणि पर्यायाने संधीचे सोने करता येते, असे मत युवा उद्योजक राहुल बडगे यांनी व्यक्त केले.
  ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित उद्यम गाथा या फेसबुक लाईव्ह मालिकेतील १५ व्या भागात ते बोलत होते.
  बदलत्या काळात सौर आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील उद्योगाच्या संधी वाढू लागल्या आहेत. वर्ष २०११ पासून मायक्राटोर्न सिस्टीम्स या नावाने विविध शैक्षणिक प्रकल्पांपासून आपल्या करियरची सुरुवात केल्याचे सांगून ते म्हणाले की, व्यवसाय करताना काळ, काम आणि वेगाला महत्त्व दिले. उत्पादन वाढविण्यावर आणि पुरवठा करण्यावर भर दिला. एका यशस्वी कामातून पुढचे काम मिळत गेले, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. शिक्षणाचा वापर उद्योगात करून आपण पुढे जायला हवे. यासाठी स्वत:चे उदाहरण देताना, अभियांत्रिकीची पदवी घेतली असून, त्या शिक्षणाचा फायदा उत्पादन क्षेत्रात करून घेणे, ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. आपल्या उद्योगाच्या विकाससासोबत, त्यांनी शेकडो स्नातक आणि स्नातकोत्तर विद्याथ्र्यांना सक्षम बनविण्यासाठी औद्योगिक क्षेत्राचे सखोल मार्गदर्शन केले आहे, हे उल्लेखनीय आहे.
  सौर आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये विशेषत: ग्रामीण भागासाठी पाणी व्यवस्थापन, qसचन सुविधा यासाठीच्या उपकरणांवर त्यांचे विशेष काम आहे. यासाठी आवश्यक असलेला बहुतांश कच्चा माल आपल्या मध्य भारतात उपलब्ध असला तरी, त्यापासून योग्य डिझायqनग करू न उत्पादने तयार करण्यासाठी कौशल्य विकास आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रात उत्पादकाचा बाजारपेठेशी प्रत्यक्ष संबंध येत नाही पण, ग्राहक कंपनीच्या गरजा आणि आवश्यकता बघून, त्यानुसार आम्ही डिझायqनग करून प्रस्ताव तयार करतो, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक आलेल्या कामातून अनुभव घेतला आणि त्यावर एक नवीन अभ्यासात्मक चाचणी प्रयोग समजून काम केले. कोणताही व्यवसाय नवीन असताना त्याला वेळ देणे आणि संयम ठेवणे आवश्यक आहे, असा मंत्र त्यांनी युवा उद्योजकांना दिला. या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांची त्यांनी यथोचित उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले.
  ………

सेवा गाथा -21

शनिवार, दिनांक 26, जून20 21सायंकाळी 6.30 वाजताआपली भेट होणार आहे...

नि:स्वार्थ, पारदर्शीपणा आणि सत्पात्री विनियोग असल्यास दात्यांची कमी नाही - रवींद्र कर्वे

ग्रामायण ज्ञानगाथा मध्ये रवींद्र कर्वेदेणगीदार खूप आहेत पण त्यासाठी विश्वास...