ज्ञानगाथेत उलगडणार कचरामुक्त नागपूरचे स्वप्न

ज्ञानगाथेत उलगडणार कचरामुक्त नागपूरचे स्वप्न
नागपूर, ५ मार्च
स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि कचरामुक्त नागपूर शहर हे प्रत्येक नागपूरकरराचे स्वप्न आहे. मात्र, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी काही निवडक लोक झोकून देऊन कार्य करताना दिसतात. त्यांच्यापैकीच एक आहेत नागपूरच्या अनसुया काळे छाबरानी ! गेल्या सात वर्षांपासून नागपूर शहरात कचरा व्यवस्थापन, पर्यावरणविषयक सवयी, समस्या आणि त्यावरील उपायांसाठी त्या स्वच्छ असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. शिवाय, पर्यावरण प्रेरणा विदर्भच्या त्या सदस्य असून, सिव्हील लाईन्स संघटनेच्या अध्यक्ष आहेत. ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने, रविवार ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित ज्ञानगाथा या फेसबुक लाईव्ह मालिकेच्या ३५ व्या भागात त्या सहभागी होणार आहेत. त्यांचे कार्य आणि नागपूरच्या पर्यावरण स्थितीविषयीच्या शंका, या कार्यक्रमातून विचारता येतील. या कार्यक्रमात नागपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Gram ayan Social Information Centre

Fill up the google form by clicking the link to...