ग्रामायण प्रतिष्ठानची सेवागाथा आज

ग्रामायण प्रतिष्ठानची सेवागाथा आज
नागपूर, १९ मार्च
उपराजधानीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा पसरत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, ग्रामायण प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने, सातत्याने आभासी माध्यमातून प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या भेटी-मुलाखतींचा कार्यक्रम आयोजिण्यात येत आहे. या क्रमात, वरदान या संस्थेच्या अध्यक्ष मंगला देशकर यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास उलगडून दाखविणाèया संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित या कार्यक्रमातून वरदान या संस्थेमार्फत राबविल्या जाणाèया सामाजिक उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. ही संस्था दत्तक विधान प्रचार आणि प्रसारासह , लहान मुलांचे संगोपन केंद्र, दत्तक कार्य, पृथा-अविवाहीत मातांसाठी सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र यासह महिला कल्याण आणि बालविकासाच्या क्षेत्रात मोठे योगदान देत आहे. या ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित राहून, आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Gram ayan Social Information Centre

Fill up the google form by clicking the link to...