ग्रामायण कृषी सुपोषण जनजागरण अभियान

ग्रामायणचे यशस्वी कृषी  सुपोषण जनजागरण अभियान

9 दिवस 9 वक्ते :

समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आधी गावांचा विकास व्हायला हवा. ग्रामीण जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त व्हायला हवी. असे स्वामी विवेकानंदांचे विचार होते. स्वामीजींपासूनच प्रेरणा घेऊन त्यांच्या दीडशेव्या जयंतीचे वर्षापासून म्हणजे 2012 पासून ग्रामायण चे कार्य सुरू आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती आपापल्या शक्तीनिशी काम करीत असतात. त्यांना शहरी समाजातून सर्वतोपरी बळ मिळावे अशा उद्देशाने ग्रामायणचे कार्य सुरू आहे.

कृषी हे ग्रामीण भागाचे, जीवनाचे अभिन्न अंग आहे या कृषीच्या समृद्धीसाठी ग्रामायण 1 ते 13 ते जून या काळात भूमी सुपोषण जनजागरण अभियान  चालवले. कोविडच्या प्रादुर्भावानंतर गेल्या वर्षभरापासून ग्रामायणने आपले कार्य आभासी स्वरूपात माहितीपूर्ण कार्यक्रमातून सुरू ठेवले. कृषीची दशा आणि परिवर्तनाची दिशा या कृषी संबंधित महत्त्वपूर्ण अशा नऊ विषयांवर नऊ तज्ञ व अनुभवी मान्यवरांचे व्याख्याने आयोजित करून एक प्रकारे कृषी नवरात्र साजरे केले. त्याला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या वर्षभरात एकूण 101 व्याख्याने आयोजित करण्यात आली. कृषीची दशा आणि परिवर्तनाची दिशा या अंतर्गत कृषीतील मूलभूत समस्या, कृषी आणि दुग्ध व्यवसाय, जैविक खते, नैसर्गिक शेती, गौ आधारित शेती, शेती आणि जलसंवर्धन आणि स्वदेशी बीजसंवर्धन आणि देशातील शेतीची एकूणच स्थिती आणि पुढील धोरण आदी विषयांवर विविध तज्ञ व्यक्तींद्वारे आभासी पद्धतीने मार्गदर्शन झाले.

शाश्वत जीवनासाठी शाश्वत शेती

ग्रामायणच्या कृषी प्रबोधन अभियानात डॉ. निंबाळकर

शाश्वत जीवनासाठी शाश्वत शती हा मूलभूत पाया आहे. याकरिता वन, जमीन, निसर्ग पाणी या सर्वांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे, असे विचार प.कृ.वि.चे माजी कुलगुरू व प्रसिद्ध कृषीतज्ञ डॉ.शरद निंबाळकर यांनी मांडले. विद्यमान स्थितीत परिवर्तन करून दिशा द्यायची असल्यास आमूलाग्र बदल करावे लागतील. जमिनीचे संवर्धन (डेळश्र उेपीर्शीींरींळेप) हा कृषीचा पाया आहे. त्यानेच कृषीची दशा बदलेल. आपल्या पूर्वजांनी या वसुंधरेला मानाचं स्थान देत नारायणी म्हटलं आहे. मानवाच्या जगण्याचा आधार ही वसुंधरा आहे. माणसाच्या शरीराला आवश्यक अन्न,जीवनसत्व ही जमीनच देते. परंतु विकास व पाश्चात्यांचं अंधानुकरण यासाठी आम्ही या भूमीला निकस करुन टाकले आहे. ज्या देशानी माती गमावली, त्या देशाची माती होणं अटळ आहे. या जमिनीपासून जस्त,फाँस्फरस,सोने यासारखे अठरा प्रकारचे खनिजे मिळतात व सूर्याच्या प्रकाशामुळे अन्नधान्य, फळं, फुलं, झाडं मिळतात. म्हणून जमीन आपलं जीवन आहे. आपण जर मातीची माती करण्यापासून प्रवृत्त झालो नाही, तर संपूर्ण मानवजातीला धोका आहे, असे त्यांनी सांगितले.

पशुपालन हा पूरक व्यवसाय शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास शेतकर्‍यांच्या आत्महत्या टळू शकतात –  डॉ. किशोर बिडवे

गेल्या दशकात विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्याप्रमाणावर झाल्या. याचे कारण काय याचा खोलात जाऊन विचार केला तर असे लक्षात येते की विदर्भातले शेतकरी फक्त शेती या एकाच व्यवसायावर अवलंबून असतात. जागतिक हवामान बदलत चाललेले आहे. त्यामुळे खरिपाच्या हंगामात पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होतो. अवकाळी पाउस आला तर हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होते. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. जे शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून असतात त्यांनाच आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही असे वाटते. त्यांनी जर शेती बरोबरच दुसरा एखादा पूरक व्यवसाय सुरु केला तर त्यांचे दैनंदिन खर्च त्यातून निघू शकतात त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. पशुपालन हा त्यातील अत्यंत फायदेशीर व सोपा उपाय आहे असे पंजाबराव कृषी विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधक डॉ. किशोर उत्तमराव बिडवे यांनी सांगितले.

जैविक खत हे कृषी भूमी सुपोषणाला संजीवनी देणारे – श्री. यशवंत पल्लेवार

कृषी भूमी सुपोषणाला संजीवनी देणारे जैविक खत हे सर्वोत्तम आहे. आपल्या देशात शेती मूलत: तीन प्रकारचे खत वापरून केल्या जाते. रासायनिक खत, शेणखत व हिरवळीचे खत. रासायनिक खतांच्या वापराने जमिनीची पोषण क्षमता नष्ट होते. ती नापिकी होते. शेणखताची प्रक्रिया ही कठीण आहे. ती पूर्ण न झाल्यास नुकसान होते. हिरवळीच्या खताच्या वापरात उत्पादनावर मर्यादा येते. असे श्री. यशवंत पल्लेवार यांनी सांगितले.

भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली (पुसा), या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक खताचं संशोधन करुन शेतकर्‍यांना भूमी सुपोषणासाठी एक संजीवनी दिली आहे असे विचार श्री यशवंत बाबुरावजी पल्लेवार यांनी मांडले.

निसर्गाचा घटक समजून नैसर्गिक शेतीकडे वळणे हाच पर्याय – वसंतराव फुटाणे

मनुष्य हा निसर्गाचा घटक आहे. निसर्गात त्याचा जसा वाटा आहे, तसा तो इतर अनेक पशुपक्षी जीवजंतू यांचा पण आहे. हे समजून नैसर्गिक, विषमुक्त शेतीकडे वळणे याशिवाय पर्याय नाही. असे विचार प्रसिद्ध कृषीतज्ञ आणि नैसर्गिक शेती वरील अधिकारी, अभ्यासक शेतकरी श्री वसंतभाऊ फुटाणे यांनी मांडले.

ट्रॅक्टर सोडा, बैलांद्वारे शेती करा. सर्वप्रकारच्या पशुधनाचे मूत्र शेतात मुरवा मग युरिया शेतात टाकण्याची वेळ येणार नाही. निसर्गाला त्याचे काम करू द्या,त्यात हस्तक्षेप करू नका. माती झाकलेली राहू द्या. माती पलटवल्याने आतील भाग अधिकाधिक कडक होत जातो व पाणी शेतात मुरत नाही. नांगरणीच्या जुन्या पद्धतीनेच माती भुसभुशीत राहते. जुन्या लोकांचे शेतीतील शहाणपण आज शेतकर्यांना पुन्हा शिकवण्याची नितांत गरज आहे, असेही ते म्हणाले.

भूमाता,  गोमाता यांची काळजी केल्यास समृद्ध व आरोग्य संपन्न होऊ – हेमंत सिंह चव्हान 

भूमाता व गोमाता यांची काळजी आपल्या आईप्रमाणे घेतल्यास शेतकरी समृद्ध होईल आणि आपण  सर्व प्रकारच्या रोगराईचा समर्थपणे सामना करण्यासाठी प्रतिकार संपन्न होऊ ,असे विचार प्रसिद्ध कृषी अभ्यासक व मार्गदर्शक श्री हेमंत सिंह चौधरी यांनी आज मांडले. जीवामृत, बीजामृत, घन बीजामृत, आच्छादन आणि वाफसा म्हणजे पाणी देण्याची पद्धत हे सेंद्रिय शेतीचे  आधारस्तंभ आहेत, असे सांगून या सर्व गोष्टी कशा तयार करायच्या  याची सविस्तर व सचित्र माहिती त्यांनी दिली.

गौ आधारित शेती ही देशाची शाश्वत संस्कृती – सुनील जी मानसिंहका

गौ आधारित  शेती ही हिंदूस्थानची शाश्वत संस्कृती आहे, अशा   विचाराचे  प्रतिपादन श्री सुनील मानसिंहका यांनी केले.

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांनाही कृषी  हीं भारताची  संस्कृती  असल्याचे कसे ठणकावंले होते याचीही  आठवण त्यांनी  करून  दिली.

गोवंशाची महत्ता सांगताना त्यांनी गोमय वसते लक्ष्मी,  गोमूत्र लभते धनम, असे सूत्र सांगून आज वैश्विक  स्तरावर याविषयी  काय सुरु आहे, याची  माहिती दिली.

आपल्या देशात  कृषी  अनुसंधान  आयोग मनीती आयोगालाही यापासून होणार्‍या फायद्यामुळे यावर विचार  करावा लागेल, अशी  स्थिती आहे.

भूजल समृद्धिसाठी पाणी व्यवस्थापन आवश्यक – माधव कोटस्थाने

पावसाच्या पाण्याच्या नियोजनाचा अभाव व जमीन व पाणी यांच्या समृद्धिसाठी आवश्यक वृक्ष संवर्धनाविषयी अनास्था, हेच आजच्या कृषी च्या दशेचं कारण असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध जल संधारण तज्ञ श्री माधव कोटस्थाने यांनी केले. ते आज ग्रामायण तर्फे आयोजित कृषीची दशा व परिवर्तनाची दिशा या विषयावरील पंधरा दिवसीय व्याख्यान मालेतील सातवे पुष्प गुंफतांना बोलत होते.

कार्यक्रमाचा आरंभच सामाजिक दूरदृष्टी असणारे खासदार श्री नितिनजी गडकरी यांच्या पुढाकाराने स्थापित पूर्ती सिंचन समृद्धि कल्याणकारी संस्थेव्दारे क्रियान्वित तामसवाडा प्रकल्प  दाखवून झाला. वर्धा जिल्ह्यातील विकासाच्या दृष्टीने अतिशय मागास असे तामसवाडा गांव त्यांनी प्रायोगिक स्तरावर निवडले. यात श्री माधव कोटस्थाने यांचेसारखे जलसंवर्धन तज्ञ, अभियंते, औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ व समाजसेवक यांच्या सहयोगाने हा प्रकल्प यशस्वी झाला. पाणी हेच जीवन हेच उद्दिष्ट ठेवून या प्रकल्पावर काम झाले. जलसंवर्धनासाठी माथा ते पायथा हा आधार ठरवल्या गेला. डोंगरावरून येणार्‍या पाण्याचे, नाल्याचं रुंदीकरण, खोलीकरण, गाळ उपसणे आदी शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन केले. परिणामी जमिनीचा भूजल साठा तिप्पट वाढला व शेतीची उत्पादन क्षमता वाढली. शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली. ही संस्था आपल्या अनुभवाचा अन्यत्र निशुल्क लाभ देण्यास सज्ज आहे. केंद्रीय भूजल बोर्ड, नीती आयोगाने सुद्धा या संकल्पनेला मान्यता दिली आहे.

माती -पाणी -बियाणे हे शाश्वत शेतीचे ब्रम्हा-विष्णू-महेश बीज संवर्धक –  साकरकार

माती, पाणी आणि बियाणे हे तीन ब्रम्हा-विष्णू-महेश आहेत असे मानून शाश्वत शेतीचे कार्य चालते. शेतीची दशा बघण्याआधी मनुष्याची आताची दशा काय आहे याचा विचार करून शेतीची दिशा ठरविली जावी असा मोलाचा विचार श्री रमेश साकरकार यांनी ग्रामायण प्रतिष्ठान द्वारा आयोजित कृषी ची दशा व परिवर्तनाची दिशा या विषयावरील पंधरा दिवसीय व्याख्यानमालेतील 8 वे पुष्प गुंफतांना प्रकट केला. रमेश साकरकार 32 वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहेत. स्वतःच्या तीन एकर शेतीत 70 ते 80 उभे पीक ते दरवर्षी घेतात. नवधान्य बीज बँक त्यांनी स्थापित केली आहे, त्यात 272 प्रकारची देशी वाणं आहेत. सेंद्रिय शेती बद्दल त्यांच्या वडिलांनी सांगितले की दाट दुट बोना, तो घर मे सोना, पतला पतला बोना तो सालभर रोना. आईने सांगितले नया नो दिन, पुराना सौ दिन म्हणजेच आपल्या पूर्वजांना सेंद्रिय शेती बद्दल चांगलाच अनुभव होता, असे ते म्हणाले. या व्याख्यानात श्री साकरकार यांनी त्यांच्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांबद्दल वेगवेगळे फोटो दाखवून आपले अनुभव कथन केले.

15 मे बीजोत्सव, 2आक्टोबर रगबी बीज मेळावा आणि 25 डिसेंबर पीक पाहणी मेळावा. तसेच त्यांनी पंचसूत्री कार्यक्रम दिला आहे गावोगावी बीज महोत्सव भरवून महिलांना देशी वाणाची ओळख करून देणे. शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांना बियांसाठी दत्तक घेणे महाविद्यालयातील मुलांना शेतीविषयक धडे देणे. धान्याचा उपयोग दारू बनविण्यासाठी न करता व्यसनमुक्ती करणे. पूर्वजांच्या अनुभवावर आधारित बीज विद्यापीठ स्थापन करणे. याप्रकारे शाश्वत शेती बद्दल बियांच्या देशी वाणाच्या संवर्धनाबद्दल अतिशय मूलभूत विचार त्यांनी मांडले. दर्शकांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे ही मिळाली. श्री साकरकार यांना एम. एस .स्वामीनाथन फेलोशिप, दीनदयाल पुरस्कार, आपुलकी पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. व्याघ्र प्रकल्पग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना साखरकर यांनी परस बागांचे प्रशिक्षण गावकर्‍यांना दिले. त्यांच्या शेताला आजवर अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.

शेतीची स्थिती सुधारण्यासाठी मगो कृषी वाणिज्यम्फ सूत्र स्वीकारावे

ग्रामायण कृषी प्रबोधन अभियान समारोपात  दिनेशजी

चुकीच्या धोरणामुळे भारतात शेतीची दशा बिकट झाली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी शेतीकरता मगो कृषी वाणिज्यम्फ हे सूत्र स्वीकारावे लागेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री श्री दिनेशजी कुळकर्णी यांनी केले. ते ग्रामायण प्रतिष्ठान नागपूरच्या कार्यक्रमात मकृषीची दशा आणि परिवर्तनाची दिशाफ विषयावर अभियानाच्या  समारोप प्रसंगी बोलत होते.

या कृषी प्रबोधन अभियानात नऊ विषयांवर नऊ वक्ते बोलले. ग्रामायणचे या वर्षभरात एकूण 101 कार्यक्रम फेसबुक लाईव्ह मार्फत झाले .

दिनेशजी म्हणालेत की, इंग्रजांनी शेतीचे हे सूत्र तोडले.फक्त कच्च्या मालाचा पुरवठा म्हणून शेतीकडे पाहिले. त्यामुळे गावांमधले शेतीशी संबंधित उद्योग – व्यवसाय नष्ट झालेत. गावांमध्ये बेरोजगारी वाढली. स्वातंत्र्यानंतर शेतीवर अनावश्यक तंत्रज्ञान थोपले गेले, त्यामुळे शेतीचा फायदा होण्याऐवजी नुकसान झाले.

यापुढेही महिन्यातून 2 वेळा कृषीगाथा या सदरात दोन तज्ञ शेतकरी व्यक्तींचे आभासी मार्गदर्शन ग्रामायण करून देणार आहे. याशिवाय कृषी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर कार्यशाळाही होणार आहेत सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे ग्रामायणाने आवाहन केले आहे.

सेवा गाथा -21

शनिवार, दिनांक 26, जून20 21सायंकाळी 6.30 वाजताआपली भेट होणार आहे...

नि:स्वार्थ, पारदर्शीपणा आणि सत्पात्री विनियोग असल्यास दात्यांची कमी नाही - रवींद्र कर्वे

ग्रामायण ज्ञानगाथा मध्ये रवींद्र कर्वेदेणगीदार खूप आहेत पण त्यासाठी विश्वास...