गांधी-विनोबांचे विचार जगणा-याची सेवागाथा

गांधी-विनोबांचे विचार जगणा-याची सेवागाथा

 • ग्रामायण प्रतिष्ठानचा उपक्रम
  नागपूर, २४ एप्रिल
  गीताई आणि गीता प्रवचने ही माझ्यानंतरही जगाला प्रेरणा देत राहील, असे विनोबा भावे म्हणत. त्यांच्या प्रेरणेतूनच निवेदीता निलयमच्या माध्यमातून समाजकार्याला वाहून घेतले. वर्ष २००८ मध्ये भारत भ्रमणाला निघालो. भारत अध्ययन यात्रा असे या उपक्रमाचे नाव होते आणि त्या माध्यमातून देशभरातील समाजकार्ये बघून समजून घेतली. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांना आचरणात आणून, समाजकार्याला वाहून घेणारे रqवद्र गावंडे यांचे हे मनोगत आहे.
  ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूरच्या सेवागाथा या फेसबुक लाईव्ह मालिकेतील अठराव्या भागात अत्यंत साधेपणाने राहून, कोणताही गाजावाजा न करता समाजसेवेचे व्रत अंगिकारणाèया या कर्मयोग्याची गाथा उलगडली. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात गवताने शाकारलेल्या आणि मातीच्या qभती असलेल्या त्यांच्या कुटीच्या माध्यमातून, ग्रामविकासाच्या नवनवीन संकल्पना सहजतेने राबविल्या जात आहेत. या कुटीत सौरऊर्जेवर चालणारे लाईट्स आणि मातीचा फ्रीज यांचा वापर केला जात असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले.
  आपला प्रवास सांगताना त्यांनी काही महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख केला. त्यात, अंत:प्रेरणेतून शिक्षकाची नोकरी सोडून पूर्णवेळ समाजसेवा करण्याचा निर्धार केल्याचे त्यांनी नमूद केले. सेवाग्राम आश्रमात राहत असताना, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गाव संकल्पनेतून गावात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. संपूर्ण जिल्ह्याची सायकल यात्रा करून, तालुके आणि गावातील स्थिती समजून घेतली.
  विशेषत: नेर तालुक्यातील पशूधन आणि खनिजांचा अभ्यास केला. गावात महिलांना रोजगार निर्माण व्हावा आणि गांधीजींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी खादी तयार करण्याचे केंद्र सुरू केले. तालुका स्वराज्य केंद्र स्थानिकांच्या गरजा आयुर्वेदीक औषधी, कृषी उत्पादने, सौंदर्य प्रसाधने, तालुकास्तरावर आपली उत्पादने तयार करून ती तालुक्यात विकायचीत. या माध्यमातून तालुका स्वयंपूर्ण होईल, अशी त्यांची संकल्पना आहे.
  त्यासोबतच, विकासकामे, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काम सुरू करायचे, असा हा प्रयोग आहे. तालुकास्तरीय शासन व्यवस्था या संस्थेची संकल्पना असून, त्यात ग्रामोद्योग निर्माण करण्यासह पंचायत राज यंत्रणेला स्वायत्त करावे, यादृष्टीने आपले प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. यावेळी सूत्रसंचालन ज्योती तारे यांनी केले. या आभासी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांनी शंकानिरसन केले.
  चौकटीत….
  ग्रामायणची ज्ञानगाथा आज…
  ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने, रविवार २५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता ज्ञानगाथा या फेसबुक लाईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी ”कोविड मानसिकता आणि त्यावरील उपाय” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वच स्त्री-पुरुषांसाठी सध्या हा विषय महत्वाचा असल्यामुळे, त्यांनी या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
  …….

सेवा गाथा -21

शनिवार, दिनांक 26, जून20 21सायंकाळी 6.30 वाजताआपली भेट होणार आहे...

नि:स्वार्थ, पारदर्शीपणा आणि सत्पात्री विनियोग असल्यास दात्यांची कमी नाही - रवींद्र कर्वे

ग्रामायण ज्ञानगाथा मध्ये रवींद्र कर्वेदेणगीदार खूप आहेत पण त्यासाठी विश्वास...